आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कांकरिया एजन्सीजला पोस्ट ऑफिस उत्कृष्टता पुरस्कार

Spread the love

पुणे : गुंतवणूक क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कांकरिया एजन्सीज यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याच परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवताना, त्यांना पोस्ट ऑफिस पुणे पूर्व विभागाकडून “उत्कृष्टता पुरस्कार २०२४-२५” प्रदान करण्यात आला.

पुणे पूर्व विभागाच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चिंचवडगाव, पुणे – ३३ पोस्ट कार्यालयामार्फत सर्वाधिक नवीन खाती (२०९०) उघडण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक मिळाला.
या गौरवप्रसंगी पोस्टमास्तर जनरल, पुणे यांच्या उपस्थितीत डीपीएस पुणे रिजनच्या सिमरन कौर यांच्या हस्ते प्रा. श्री. अनिल कांकरिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.