51 वर्षांच्या परंपरेनुसार सामूहिक त्रिशरण पंचशील, मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांची रेलचेल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाही मोठ्या उत्साहात व पारंपरिक श्रद्धेने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन भागवत शिंदे (रिपाई, मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामूहिकरीत्या त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर नालंदा लोमटे, नैत्री लोमटे, तेजल साळवे यांच्यासह इतरांनी प्रभावी भाषणे केली.
51 वर्षांची परंपरा जपत, या जयंती कार्यक्रमात समाजातील विविध घटकांनी सहभाग घेतला. गावातील कोणत्याही सामाजिक वा धार्मिक कार्यक्रमात नेहमीच उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे माजी पंचायत समिती सदस्य मुक्तप्पा तळेकर यांचा यावेळी महात्मा फुले पगडी, शाल व भारताचे संविधान देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, मुक्तप्पा तळेकर, सरपंच संदीप मगर, ग्रामसेविका नीलम जानराव, मुंबई पोलीस प्रियांका लोमटे, अशोक वाघमारे, झुंबर गायकवाड, संजय शिंदे, केरबाप्पा क्षीरसागर, बब्रुवान कदम, गुरूलिंग तळेकर, प्रभाकर कचरे, प्रशांत कदम, बलभीम तळेकर, अभिमान मस्के, बिभीषण कदम, आकाश टेकाळे, निलेश टेकाळे, रोहिदास टेकाळे, गौतम टेकाळे, राहुल बनसोडे, संघकार लोमटे, अमित लोमटे, आश्वजीत मस्के, अर्जुन टेकाळे, अनिकेत टेकाळे, नितीन कसबे, खंडू टेकाळे, विकास लोमटे, निपण लोमटे, श्रेयश टेकाळे, साहिल टेकाळे, बिभीषण टेकाळे तसेच महिला वर्गात सुरेखा लोमटे, मीरा लोमटे, शेषाबाई टेकाळे, साळवे मॅडम व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपसरपंच रवींद्र लोमटे यांनी केले. सायंकाळी पाच वाजता मुख्य चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
