समाजशास्त्र विषयातील संशोधन कार्याची दखल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक पदावर पदोन्नती दिली आहे.
डॉ. बोराडे यांचे समाजशास्त्र विषयातील संशोधन, विविध शोधनिबंध लेखन, तसेच सामाजिक संशोधन अहवालांवरील कार्य उल्लेखनीय आहे. नुकतेच त्यांच्या एका लघुशोध अहवालास शासकीय अनुदान प्राप्त झाले असून, त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याची शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात विशेष दखल घेतली जात आहे.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळ, पाथरुडचे अध्यक्ष डॉ. उद्धव बोराडे, उपाध्यक्ष श्री. डि. डी. बोराडे, सचिव श्री. मुरलीधर काटे व सहसचिव तथा प्राचार्य प्रा. संतोष शिंदे यांनी डॉ. बोराडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.
सर्व स्तरातून डॉ. बोराडे यांना शुभेच्छा व सन्मान मिळत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
