आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

भूम : महात्मा बसवेश्वर यांची जयंती भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याची व त्यांच्या शिकवणीची महती मांडली.

या कार्यक्रमात वीरशैव लिंगायत समाजाचे प्रमुख आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

यामध्ये अशोक तोडकर, सिद्धेश्वर मंनगिरे, अमित होळकर, संजय होळकर, डॉ. शिव शंकर खोले, विजयकुमार सोलापूरे, बाजीराव बळे, मधूकर शेटे, आकाश शेटे, धनंजय रणखाब, रविंद्र होळकर, प्रभाकर शेटे, चंद्रकांत गवळी यांसारखे समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे समाजामध्ये एकजुटीचा आणि धार्मिकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.