मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे भव्य मिरवणूक : मशीदसमोरील कव्वालीने वातावरणात भर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे आयोजित ‘शिव-बसव मिरवणूक’ जल्लोषमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीत विविध पथकांनी सहभाग घेतला असून, राहिमतपूर येथील अघोरी नृत्य पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
मिरवणुकीचा प्रारंभ आमदार दिलीप सोपल आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते आडवा रस्ता येथून पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, कीर्तनकार शिवलीला पाटील, माजी नगराध्यक्षा विश्वास बारबोले, योगेश सोपल, गणेश जाधव, सौ. मंगल शेळवणे, दगडू मांगडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, संदीप बारंगुळे, दत्ता शिंदे, राजाभाऊ रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत अघोरी नृत्य पथकासोबतच शिवलीला पाटील यांच्या वारकरी संस्थेचे मुलींचे टाळ पथक, वीर फकिरा लेझीम पथक, ढोल पथक, आकर्षक बाहुल्यांचे पथक आणि डीजे पथक यांनी सहभाग घेतला. अघोरी पथकाच्या सादरीकरणाने बार्शीकरांची विशेष दाद मिळवली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
या मिरवणुकीचे यशस्वी आयोजन नागेश अक्कलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत दसंगे, विठ्ठल गुडे, अनिल चाबुकस्वार, जालिंदर देवकर, प्रफुल्ल केसकर, गणेश निंबार्गी, प्रवीण घोटाळे, आण्णा घोटाळे, मनोज मुलगे, प्रशांत दसंगे, कल्पित आगळे, चेतन मुलगे, विष्णू देवकर व मित्रप्रेम ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन केले.
शाहीर अमर शेख चौकातील मदिना मशीद समोर मिरवणूक पोहोचताच डीजेवर कव्वाली लावण्यात आली. या प्रसंगी नागरिकांनी आनंद व्यक्त करत सौहार्दपूर्ण वातावरणाचे स्वागत केले.
