गुणवत्तेची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कॉलेजच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांनी सातत्याने घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची ओळख टिकवून ठेवली आहे.
या यशस्वी निकालानंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आणि सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, समूह प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांडे, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
विज्ञान शाखेत पवनी शार्दूल भिडे हिने ९२.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संयुक्ता अशोक मोरे हिला ९२.३३ टक्के (द्वितीय), चिन्मयी ज्ञानेश रहाणे हिला ९२ टक्के (तृतीय), शौनक विजय तिकोटेकर व आर्या सुनील बोर्डे यांना ९१.८३ टक्के गुण (चतुर्थ), तर शर्वरी योगेश महाबळेश्वरकर, रेवा सुनील करंदीकर व निषाद नैनीश लुब्री यांना ९१.६७ टक्के गुण मिळाले आहेत, त्यांनी अनुक्रमे पंचम क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेत विनीत महेश बंग याने ९१ टक्के (प्रथम), प्रसाद काशवी याने ९० टक्के (द्वितीय), श्रीम गिरीश पसाद याने ८५.१७ टक्के (तृतीय), मीनाक्षी राहुल मालेगावकर हिने ८०.३३ टक्के (चतुर्थ), तर श्रीनिवास पांडुरंग दगडे याने ७९.६७ टक्के (पंचम) गुण मिळवले.
कला शाखेत झलक दर्शन गांधी हिने ९०.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. शुभश्री विश्वनाथ हिला ८९.८३ टक्के (द्वितीय), शर्वरी मंदार दामले हिला ८७.१७ टक्के (तृतीय), जान्हवी अजयकुमार हिला ८६.६३ टक्के (चतुर्थ), तर निखिल संतोष खळदकर याला ८५.५० टक्के गुण मिळून पंचम क्रमांक मिळाला.
“दरवर्षीप्रमाणे यंदाही सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत संस्थेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशस्वी होण्यासाठी सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यात येते. क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांतून त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी संधी दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
