बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन श्रीराम मंदिरात सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : ब्राम्हण महासंघ, भूम यांच्या वतीने बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव समारंभ दि. ९ एप्रिल रोजी कसबा येथील श्रीराम मंदिरात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक एकनाथ बेलसरे, ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, तालुकाध्यक्ष सुधीर देशमुख, अनिल बुरटे, विलासराव देशमुख व चिन्मय कुलकर्णी हे होते.
या कार्यक्रमात श्रावणी औदुंबर कुलकर्णी, समीक्षा शेखर कुलकर्णी, संस्कृती प्रसाद कुलकर्णी, प्रांजल विलासराव कुलकर्णी, कार्तिक किशोर वंजारवाडकर, ओंकार अभय खुळे, संस्कार संतोष कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित समाजबांधव व भगिनींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व प्रेरणादायी मार्गदर्शनही केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कुलकर्णी यांनी केले. या गौरव समारंभासाठी ब्राम्हण समाजातील बांधव व महिलांची मोठी उपस्थिती होती.
