जैन समाजाच्या सेवेत अग्रगण्य योगदानाची दखल
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांची ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनच्या प्रांतीयमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
स्थानकवासी जैन समाजाची मातृसंस्था असलेल्या ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (दिल्ली)च्या चतुर्थ झोनमध्ये प्रांतीयमंत्री म्हणून हेमंत पोखरणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
या नियुक्तीची अधिकृत घोषणा झोनचे प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा आणि प्रांतीय सेक्रेटरी शांतीलाल दुगड यांनी केली. हेमंत पोखरणा यांनी अनेक वर्षांपासून साधुसंतांच्या सेवा, धार्मिक कार्ये आणि समाज संघटनामध्ये सक्रिय योगदान दिले आहे. ते जैन श्रावक संघाचेही सक्रिय पदाधिकारी असून, समाजहितासाठी तन-मन-धनाने कार्यरत आहेत.
त्यांच्या या समर्पित सेवाभावाची दखल घेऊन ही सन्माननीय जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
