आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारहाण करुन केला खुन

Spread the love

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यु झाला़ उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.

दीक्षा दीपक भिसे (वय २५, रा. वांजळे धावडे बिल्डिंग, खडकमाळ, कोंढवे धावडे) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपक भिसे (वय २६) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १५ मे रोजी रात्री बारा ते १६ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत दीक्षा भिसे यांच्या बहिणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा आणि दीपक भिसे यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. दीपक हा वाहनचालक म्हणून मिळेल तेथे काम करतो. दीपक भिसे याला दीक्षा हिच्या चारित्र्यावर संशय होता.

त्यावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. गुरुवारी रात्री मध्यरात्री त्यांच्यात अशीच भांडणे झाली. त्यावेळी दीपक याने दीक्षा यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यात दीपक याने तिच्या छातीत लाथ मारल्याने ती जबर जखमी झाली होती.

त्यातच तिचा मृत्यु झाला. ही माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दीपक भिसे याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे तपास करीत आहेत.