दोन तासांत अटक : शस्त्र जप्त, आरोपींची काडली वरात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दिनांक 16 मे 2025 रोजी बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्रास झालेल्या मारहाणीच्या कारणावरून एका टोळीने धारदार शस्त्रासह परिसरात दहशत माजवली. या टोळीतील 7 ते 8 जणांनी दोन वाहने – एक दुचाकी व एक रिक्षायांचे नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत अवघ्या दोन तासांत सर्व आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, ज्या भागात या आरोपींनी दहशत माजवली, त्याच भागातून पोलिसांनी आरोपींची वरात काढून जनतेला पोलिसांची कारवाई दाखवली.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 111/2025 नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी वापरलेली धारदार शस्त्रे पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे करीत आहे.

















