आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पंकज देशमुख, संजय पाटील, राजेश बनसोडे पुण्यात अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्त

Spread the love

पुणे : राज्य शासनाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी तयार केलेल्या आलेल्या पोलीस अधीक्षक श्रेणीतील १४ पोलीस अधीक्षकांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी बढती दिली आहे.

शासनाने एकूण ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि बिनतारीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची बढतीवर पुणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संजय बी. पाटील यांची पुण्यात अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर, पुण्यातील अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रविण पाटील आणि अरविंद चावरिया यांची बदली करण्यात आली आहे..