आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शंकरराव पाटील महाविद्यालयात डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती

Spread the love

भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय योगदानाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ही निवड महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. अनुराधा जगदाळे या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांनी शैक्षणिक प्रकल्प, संशोधनपर लेखन आणि विद्यार्थी कल्याणासाठी विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडे नॅकच्या आक्युएसी समन्वयक म्हणून काम पाहण्याचा अनुभवही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत.

या नियुक्तीबद्दल विद्या विकास मंडळ पाथरुडचे अध्यक्ष डॉ. उद्धव बोराडे, उपाध्यक्ष डीडी बोराडे, सचिव मुरलीधर काटे, सहसचिव तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.