सात घरफोड्यांची कबुली : चार आरोपींना सत्र न्यायालयाकडून शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील दिवसा घरफोडी प्रकरणी मध्यप्रदेश येथील चार सराईत आरोपींना सत्र न्यायालय, बार्शी यांनी शिक्षा सुनावली आहे. यामध्ये तीन आरोपींना ५ ते ७ वर्षे कारावास व दंड, तर चोरीचे सोने वितळवून विक्री करणाऱ्या सोनारास ७ वर्षे कारावास व ₹ ५,००० दंड ठोठावण्यात आला आहे.
दि. ०६/०४/२०२३ रोजी दुपारी १:३० ते ४:०० या वेळेत बार्शी शहरातील सुभाष नगर भागात घरफोडी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५८/२०२३, भादंवि कलम ४५४, ३८०, २०१, ४१३, ३४, ७५ अन्वये नोंद करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शैलेश खेडकर, बार्शी गुन्हे शाखा पोहेकॉ अमोल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुरावे गोळा करून आरोपींचा छडा लावला.
तपासादरम्यान आरोपींनी बार्शी शहरातील एकूण सात घरफोड्यांची कबुली दिली. या प्रकरणात चार आरोपींना दि. १९ एप्रिल २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
साक्षीदार, पंच व तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षांवरून बार्शी सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. दिपेंद्रसिंग राठोर हा इंदूर येथील सराफ व्यवसायिक असून, त्याने वरील आरोपींकडून चोरीचे सोने विकत घेऊन वितळवले होते. त्यामुळे त्याच्यावर भा.दं.वि. कलम ४१३ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पो.उ.नि. शैलेश खेडकर, सफौ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, अक्षय डोंगरे, अक्षय दळवी, अनिस शेख, चालक समीर शेख (स्थानीय गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण), पोहेकॉ अमोल माने (गुन्हे शाखा,बार्शी शहर पोलीस ठाणे), सरकारी अभियोक्ता अॅड. दिनेश देशमुख, पैरवी अधिकारी पोसई संजय कपडेकर आणि पोकॉ गणेश ताकभाते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सदर खटल्याचे कामकाज माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रम आदित्य मांडे यांच्या न्यायालयात बार्शी येथे पार पडले. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली असून, त्यांची रवानगी जिल्हा कारागृह सोलापूर येथे करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
» पवन उर्फ भुरा रामदास आर्य (वय ३८, रा. इंदूर, म.प्र.) – ७ वर्षे कारावास व ₹ २,००० दंड
» मनोजकुमार ठाकूरदास आर्य (वय ३२, रा. इंदूर, म.प्र.) – ५ वर्षे कारावास व ₹ २,००० दंड
» देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर (वय ३७, रा. इंदूर, म.प्र.) – ५ वर्षे कारावास व ₹ २,००० दंड
» दिपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर (वय ४१, रा. इंदूर – सोनार) – ७ वर्षे कारावास व ₹ ५,००० दंड
