आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख

Spread the love

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले देशमुख यांची नुकतीच पदोन्नतीनंतर पुणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली होती. देशमुख यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिले.

पंकज देशमुख यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेत, तसेच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्य केले होते. त्यानंतर त्यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) झाली होती. तेथून त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती.

शहर पोलीस दलात बदली झालेले राजेश बनसोडे यांची पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बनसोडे यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

नागपूर पोलीस दलातून बदली झालेले अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील यांची प्रशासन विभागात नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.