महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सिध्दी फाऊंडेशनतर्फे स्व. मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ३०० बाटल्यांचे रक्त संकलित करण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरविण्यात आलेल्या या शिबिराला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे आयोजन सिध्दी फाऊंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड, अध्यक्ष ललित जैन आणि मुकेश छाजेड यांनी केले. कार्यक्रमावेळी आमदार हेमंत रासने, माजी नगरसेवक पिंटू धाडवे, जिनू लोढा, योगेंद्र चोरडिया, प्रवीण परदेशी, राजेंद्र देशमुख, राजेंद्र शिंदे, प्रल्हाद गवळी, संतोष भुतकर, महेंद्र सुंदेचा, सिद्धांत छाजेड, नितेश जैन, नितीन चोपडा यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवन बेद, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर, राहुल बोगावत, शैलेश बडदे, वैभव सेटीया, सचिन आडेकर, डॉ. सिद्धेश भोंडे यांनी विशेष मेहनत घेतली.
रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारा हा उपक्रम पुणेकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
“गेल्या १७ वर्षांपासून २१ मे रोजी रक्तदान शिबिर घेण्याची आमची परंपरा आहे. दरवर्षी मे महिन्यात शहरात रक्ताची टंचाई भासते. या गरजेला ओळखूनच आम्ही हा उपक्रम राबवतो. रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचतात.” – मनोज छाजेड
“गेल्या १७ वर्षांमध्ये एकूण ३३ हजारांहून अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही, आमचे मित्रपरिवार व इतर मंडळी दरवर्षी मे महिन्यात हे शिबिर आयोजित करतो. यावर्षीही रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” – ललित जैन
