आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सफाई कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Spread the love

पुणे : सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी त्यांच्या वयोगट, शैक्षणिक पात्रता आदी निकषांनुसार सविस्तर डाटाबेस तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणींबाबत आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसार खैरनार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. गुजर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे,

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनोपचार विभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड, पुणे व खडकी छावणी मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.