• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

शंशाक हगवणे, सुशिल हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा

May 30, 2025
0
30 5 25 3
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

आर्थिक उलाढाली लपविण्यासाठी स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण : १०० कोटींचे व्यवहार संशयास्पद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : परदेशी महिलेसह अल्पवयीन मुलीला आसरा देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंतनु कुकडे, रेड हाऊस फाउंडेशनचा रौनक जैन यांनी तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

बनावट स्टॅम्प पेपर नोटराईज करून ते व्यवहार कायदेशीर ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. समर्थ पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर, त्याचा मुलगा करण मानकर आणि करण मानकर यांचे सासरे सुखेन शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गित्ते यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शंतनु कुकडे (वय ५३, रा. तिरुपती अपार्टमेंट, नाना पेठ), करण दीपक मानकर (वय ३८, रा. जलसा बिल्डिंग, प्रभात रोड) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात सुखेन सुरेशचंद्र शहा (वय ६४, रा. धवलगिरी स्नेह पॅराडाईज, रामबाग कॉलनी, कोथरूड), शंतनु कुकडे आणि रौनक भरत जैन (वय ३८, रा. सूर्यप्रकाश अपार्टमेंट, मार्केट यार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता व मुख्य आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून करण मानकर याला ५० लाख रुपये देण्यात आल्याचे आढळून आले. त्याबाबत चौकशी केली असता करण मानकर याचा जबाब नोंदविण्यात आला.

त्यात त्याने सांगितले की, २०२४ मध्ये करण दीपक मानकर हा डोणजे-गोर्‍हे बुद्रुक येथे दुग्ध व्यवसाय सुरू करणार होता. त्यासाठी शंतनु कुकडे हा करण मानकर याला ५ कोटी रुपये कर्ज स्वरूपात मदत करणार होता.

या व्यवहाराबाबत कुकडे व करण मानकर यांच्यामध्ये ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर १३ जून २०२४ रोजी करारनामा करण्यात आला. त्यामध्ये हे कर्ज ४० वर्षांसाठी १६ जून २०२४ ते २०६४ पर्यंत देण्यात येणार होते. त्यावर दोघांनी सह्या केल्या आहेत.

स्टॅम्प व्हेंडर ज्ञानेश्वर भुरुक (रा. धायरी गाव) यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, त्यावर मारलेला शिक्का त्यांचा नसून दुसऱ्याने मारला आहे. स्टॅम्प पेपरवर ते स्वतः स्वहस्ताक्षरात लिहीत असून, हे हस्ताक्षर त्यांचे नाही आणि त्यांची सहीही नाही. जून २०२४चे स्टॅम्प विक्री रजिस्टर दुय्यम निबंधक यांच्याकडे जमा करण्यात आले आहे. ८९०० या नंबरच्या स्टॅम्पची विक्री त्यांनी जुलै २०२४ मध्ये केली होती.

ज्या स्टॅम्प पेपरवर करण मानकर व कुकडे यांनी करारनामा जून २०२४ मध्ये केला होता, तो स्टॅम्प पेपर प्रत्यक्षात ११ जुलै २०२४ रोजी आनंद भोसले यांना विक्री केल्याचे दिसून आले आहे. स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करून बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसऱ्या प्रकरणात सुखेन शहा यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा सिद्धांत शहा याच्या नावावर असलेल्या मुळशी तालुक्यातील पिंपरी येथील १० एकर जागेवर रिसॉर्ट तयार करणार होते. या रिसॉर्टसाठी गुंतवणुकीसाठी शंतनु कुकडे याने १ कोटी रुपये पाठवले होते.

या व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करारनामा करण्यात आला. त्यानंतर उरलेली रक्कम पाठवण्यात आली. या स्टॅम्प पेपरवर १ फेब्रुवारी २०२४ अशी तारीख आहे. या स्टॅम्प पेपरबाबत संशय वाटल्याने पोलिसांनी स्टॅम्प व्हेंडर सुनिता बोंबले यांच्याकडे चौकशी केली.

त्यांनी सांगितले की, स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं हस्ताक्षर त्यांचे नाही आणि तो स्टॅम्प पेपर बनावट आहे, असे निष्पन्न झाले. हे दोन्ही स्टॅम्प पेपर ज्यांच्याकडे नोटरी करण्यात आले, त्या अ‍ॅड. ज्योती विनायक लिमये यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, हा दस्त त्यांनी नोटरी रजिस्टरमध्ये नोंदवला होता. मात्र, ११ एप्रिल २०२५ रोजी कार्यालयातून घरी आणताना ते रजिस्टर कुठेतरी गहाळ झाले.

स्टॅम्प व्हेंडरने स्टॅम्प पेपर वितरित करण्याआधीच वापरल्याचे आढळले आहे. आपले आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी फसवणूक करण्याच्या उद्देशाने स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करून बनावट दस्त तयार करण्यात आला आणि तो खरा असल्याचे भासवण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

13

Latest Articles

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक

March 21, 2026
सूर्यदत्तची ‘फार्मालोक’ यात्रा उत्साहात संपन्न

सूर्यदत्तची ‘फार्मालोक’ यात्रा उत्साहात संपन्न

March 21, 2026
लाच घेणाऱ्या शिरूर तहसीलमधील दोघांना अटक

लाच घेणाऱ्या शिरूर तहसीलमधील दोघांना अटक

March 21, 2026
तरुणांना मारहाण करून दहशत माजविणाऱ्यांची काढली धिंड

तरुणांना मारहाण करून दहशत माजविणाऱ्यांची काढली धिंड

March 21, 2026
टुरिस्ट टॅक्सीचा वापर करून गांजाची तस्करी

टुरिस्ट टॅक्सीचा वापर करून गांजाची तस्करी

March 21, 2026
Load More
Previous Post

सफाई कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

रास्तभाव दुकानांतून तीन महिन्यांचे धान्य मिळणार जूनमध्येच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta