आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

“उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने संजय नाना गाढवे सन्मानित

Spread the love

भूम : भूम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व “विकासरत्न” म्हणून ओळखले जाणारे मा. संजय नाना गाढवे यांना सह्याद्री ऍग्रोव्हेट कंपनीतर्फे “उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारे नाना गाढवे यांनी शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रातही आदर्श उभारला आहे. त्यांच्या पशुधन व्यवस्थापन, आरोग्यदायी आहार नियोजन आणि पशू निवाऱ्याच्या व्यवस्थेची राज्यपातळीवर दखल घेऊन त्यांना हा गौरव देण्यात आला आहे.

भूम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच शेती व दुग्धव्यवसायातही एक आदर्श मॉडेल उभे केले आहे. नानांनी शेती आणि पशुधन यांचे योग्य नियोजन करून पशूंसाठी आधुनिक निवारा, संतुलित आहार व्यवस्था आणि वैद्यकीय देखभाल यावर भर दिला.

या सर्व घडामोडींचा विचार करून संगमनेर येथील सह्याद्री ऍग्रोव्हेट कंपनीतर्फे त्यांना “उत्कृष्ट गोपालक” या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार एक छोटेखानी समारंभात प्रदान करण्यात आला.

यावेळी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर सुरज जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गपाट, सोनई कॅटल फीडचे एरिया मॅनेजर शिवाजी जाधव, तसेच शुभम भांगे हे मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते गाढवे यांना गौरवपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.