• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सायबर फसवणुकीतून ₹1.22 लाखांची रक्कम परत

June 14, 2025
0
14 6 25 3
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

बार्शी पोलिसांची तत्पर कारवाई : तांत्रिक तपासातून गोपाळ पवार यांना दिलासा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी शहरातील बुरूड गल्ली येथील रहिवासी गोपाळ बाबासाहेब पवार (वय ३२) यांच्याशी संबंधित ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणात बार्शी पोलिसांच्या सायबर युनिटने तात्काळ आणि प्रभावी तपास करत एकूण ₹1.22 लाख रक्कम पीडिताच्या खात्यात यशस्वीरित्या परत जमा केली आहे.

या प्रकरणाची चौकशी बार्शी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल धनराज फत्तेपुरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांनी केली.

गोपाळ पवार हे बांबू वासे विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक ५ मे २०२५ रोजी त्यांनी अनोळखी व्यापार्‍याशी संपर्क साधून, त्याच्याकडून बांबू वासे खरेदीसाठी ₹1.22 लाख अ‍ॅडव्हान्स रक्कम ऑनलाइन स्वरूपात ट्रान्सफर केली होती. मात्र, दीर्घ काळानंतरही माल न मिळाल्याने आणि संबंधित इसमाने संपर्क टाळल्याने फसवणुकीचा संशय निर्माण झाला.

गोपाळ पवार यांनी त्वरित सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतरही त्या इसमाने दुसऱ्या मोबाईल नंबरवरून पुन्हा पैसे मागितल्यामुळे ही आर्थिक फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले.

या तक्रारीनंतर बार्शी सायबर युनिटने तपास कार्यवाही सुरू केली. निरीक्षक कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल फत्तेपुरे आणि देशमुख यांनी मोबाईल क्रमांक, बँक खात्यांची माहिती, तांत्रिक विश्लेषण आदींच्या आधारे नेमकेपणाने तपास केला.

तपासादरम्यान फसवणुकीचे स्पष्ट पुरावे मिळाले. आरोपीच्या खात्यांमधून संबंधित रक्कम ट्रेस करून १२ जून रोजी ती पीडिताच्या खात्यात परत करण्यात आली. रक्कम परत मिळाल्याने गोपाळ पवार यांनी समाधान व्यक्त करत सांगितले, “माझी फसवणूक झालेली रक्कम पोलिसांच्या तत्परतेमुळे मला पुन्हा मिळाली. तपास अतिशय अचूक आणि वेगवान होता.

यासाठी मी बार्शी पोलिस ठाणे व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानतो.” या घटनेनंतर नागरिकांमध्ये बार्शी पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे. सायबर गुन्ह्यांविरोधातील तत्परता व तांत्रिक कौशल्याबद्दल सर्वत्र प्रशंसा होत आहे.

बार्शी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे कोणताही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना पुरेशी खात्री करूनच व्यवहार करावा. तसेच फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

Latest Articles

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025
Load More
Previous Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Next Post

MAHARASHTRA NEWS NETWORK

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

June 16, 2025
ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

June 16, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta