आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वारकऱ्यांच्या पावन यात्रेला जैन महासंघाचा श्रद्धेचा नमस्कार

Spread the love

पुणे : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींचा सन्मान करत त्यांच्या भक्तीचा गौरव करण्यात आला. आष्टा (भूम) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीचे स्वागत महासंघाचे उपाध्यक्ष संतोष गुगळे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

या दिंडीचे प्रमुख वीणेकरी विठ्ठलराव आणि भोजन सहयोगी पोपटलालजी गुगळे व संतोष गुगळे यांचा महासंघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सुमारे १०० वारकरी बंधू-भगिनींना भेटवस्तू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.

संपूर्ण कार्यक्रमानंतर उपस्थितांनी भजन आणि भोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे स्वागत महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले, तर संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी महासंघाच्या कार्याची माहिती देताना, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या निःस्वार्थ भक्तीला अभिवादन केले.

या प्रसंगी माजी अध्यक्ष नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, उमेश पाटील, महामंत्री संदीप फुलफगर, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, मंत्री विरेश छाजेड, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत, सहकोषाध्यक्ष तुषार मुथा, सचिन कोगनाळे, स्नेहल भंडारी, संजय खाबिया, मनोज सोळंकी, हर्षल लुंकड, अशोक नहार, वैभव छाजेड, सुनील गुगळे, गुगळे परिवारातील इतर सदस्य आणि महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.