महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : मा. नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते एस. टी. महामंडळ भूम आगार येथे कार्यरत असलेले कर्मचारी अब्दुल शेख यांचे चिरंजीव आदिल शेख यांनी जेईई मेन्स परीक्षेत ९८.९९% आणि महाराष्ट्र सीईटी परीक्षेत ९८.८४% गुण प्राप्त करून आयआयटी जम्मू-काश्मीर येथे प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जाकीर शेख, राम बागडे, पत्रकार अब्बास सय्यद यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
