महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘जय आनंद ग्रुप’, पुणे या सामाजिक संस्थेच्या सन २०२५-२६ या कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नितीन हरकचंद ओस्तवाल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
नितीन हरकचंद ओस्तवाल हे जैन साधना सदन संस्थेचे सह-खजिनदार आहेत. ते ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे उपाध्यक्ष असून, आनंद प्रतिष्ठान आणि आर. एम. डी. स्कूल यांच्या समित्यांवर सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत.
नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष – गणेश कटारिया, महामंत्री – आनंद कोठारी, खजिनदार – दिलीप धोका यांची निवड करण्यात आली आहे.
‘जय आनंद ग्रुप’ ही संस्था अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर, अनाथ मुलांना मदत, सन्मान भूषण पुरस्कार वितरण, विद्यार्थी सन्मान आणि इतर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे.
