प्रशांत काका मुंडेकर युवा मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : ग्रामस्थांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : तालुक्यातील आरसोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रशांत काका मुंडेकर युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक भगत, शिक्षक आगळे, ढोरे, थाटे, काळे, कोल्हाळे, तांबोळी, चंदनशिवे, सातपुते यांच्यासह शिक्षिका सुरवसे, आगळे, नागटिळक, वाघमारे या सर्व शिक्षक वृंदांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर, राजकिरण गोयकर, रमेश सुरवसे, अनुरथ चंदनशिवे, सुनील पाटील, दत्ता गाढवे, भागवत गोयकर, भागवत खराडे, महादेव गोयकर, सुदाम नागटिळक, संदीप खराडे, नितीन पाटुळे, बाबा अंधारे, सोमनाथ मुंडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन गुंजाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन कैलास सातपुते यांनी केले.
