भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नॅन्सी लेक होम ते लेकटाऊन रस्त्यावर संशयित बालकास पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ०९/०७/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नॅन्सी लेक होम सोसायटीकडून लेकटाऊनकडे एक इसम गावठी कट्टा घेऊन जात आहे.
पोलिसांनी तात्काळ नॅन्सी लेक होम ते लेकटाऊन रस्त्यावर सापळा रचून संशयित इसमाचा शोध घेतला असता स्व. शंकरराव राजाराम कदम स्विमिंग टँकसमोरील रस्त्यावर एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे (पश्चिम प्रादेशिक विभाग), मा. पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहीते (परिमंडळ २), व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे (स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, संदीप आगळे यांच्या पथकाने पार पाडली.
