महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील स्वारगेट येथील दादावाडी येथे स्वर्गीय बाबुलालजी बागमार यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त १३ जुलै रोजी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरात एकूण २३५ बाटल्यांचे रक्तसंकलन झाले आणि १४३ लोकांचे वैद्यकीय तपासण्या (बॉडी चेकअप) अचूक व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडल्या. या उपक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योगपती, तसेच वितराग सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, प्रमोद दुगड, विशाल धनवडे, राम बांगड, सुशीला दुगड, नितीन मुनोत, निलेश मुनोत, संपूर्ण बागमार कुटुंबीय, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यशस्वी आयोजनामागे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली सातत्यपूर्ण तयारी आणि समर्पित मेहनत होती. या उपक्रमास लाभलेला उस्फूर्त प्रतिसाद हा समाजातील एकतेचे आणि सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरला.
कार्यक्रमानंतर बिजाबाई बागमार आणि संपूर्ण बागमार परिवाराने उपस्थित सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. तसेच सह्याद्री, दीनानाथ आणि आधार बँकेचेही विशेषतः आभार व्यक्त करण्यात आले.
