आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शंकरराव पाटील महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी

Spread the love

भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘करिअर कट्टा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या करिअर संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. त्यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी करिअर कट्टा डायरी, बॅच आणि प्रमाणपत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मानही केला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपसचिव आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ प्रा. डॉ. बोराडे, डॉ. गव्हाणे, IQAC समन्वयक डॉ. सुरवसे, धाराशिव जिल्हा ग्रामीण समन्वयक डॉ. खराटे, तालुका समन्वयक प्रा. कराळे, मागील वर्षीचे विभागीय समन्वयक डॉ. पडवळ, महाविद्यालय समन्वयक डॉ. एस. एम. अलगुंडे आणि प्रा. आर. डी. राठोड उपस्थित होते. विशेष म्हणजे धाराशिव जिल्हा निवड समितीतील विद्यार्थिनी अंजना काळे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पडवळ यांनी केले. युवकांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या हेतूने या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मसुद्याचे वाचन करण्यात आले.

यामध्ये स्वच्छता, धूम्रपान निषेध, मानसिक स्वास्थ्य, संगोपन, आदर्श जीवनशैली, नैतिक मूल्यांची जाणीव ठेवणे आणि महाविद्यालयाचा जबाबदार विद्यार्थी राहणे या विषयांवर शपथ घेण्यात आली. शपथविधी सोहळ्यात साक्षी वाघमारे – मुख्यमंत्री, इरफान पठाण – नियोजन मंत्री, तेजस्विनी साबळे – कायदे व शिस्त पालन मंत्री, रोशनी जाधव – सामान्य प्रशासन मंत्री, राजनंदिनी कुंभार – माहिती व प्रसारण मंत्री, सुहानी पन्हाळे – उद्योजकता विकास मंत्री, अनिता जाधव – रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, कोमल नवगिरे – कौशल्य विकास मंत्री, वैष्णवी पाबळे – संसदीय कामकाज मंत्री, समीना शेख – माहिती व बालकल्याण मंत्री, तसेच शुभम सांगडे – सदस्य या पदांवर विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. खंदारे, डोंगरदिवे, मसराम, कुटे, भोंग, गायकवाड, पवार, तिजारे, गिरी मॅडम, सुतार मॅडम, अंभुरे मॅडम, आवटे मॅडम आणि बारकुल यांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एम. अलगुंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. डी. राठोड यांनी केले.