आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!

Spread the love

पुणे : आजकाल अनेक फसव्या ॲप्समुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ॲप्सपासून नागरिकांनी सावध आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम (राजगड पोलीस स्टेशन) यांनी केले आहे.

सध्या सायबर गुन्हेगार फसव्या ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांचा वैयक्तिक डेटा, कॉन्टॅक्ट नंबर व आर्थिक माहिती चोरण्याचे प्रकार करत आहेत. या माध्यमातून लाखो-कोटींचा गंडा घालण्याचे सत्र सुरु आहे. दिवसेंदिवस अशा घटनांचे प्रमाण वाढत असून, अनेक उच्चपदस्थ व्यक्तीही याला बळी पडत आहेत. म्हणूनच नागरिकांनी सायबर फसवणुकीबाबत विशेष जागरूक राहणे गरजेचे आहे.

कसे फसवले जाते?
» आर्थिक पात्रता न तपासता मोठ्या रकमेच्या लोनची ऑफर दिली जाते.
» एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते.
» नंतर मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबर, फोटो यांचा ॲक्सेस मागितला जातो.
» दिलेल्या लोनवर अत्यंत जास्त व्याजदर व छुपे कर आकारले जातात.
» लोनचे पैसे परत न दिल्यास, फोटो मॉर्फ करून अश्लील बनवून कॉन्टॅक्ट्सना पाठवले जातात.
» धमकीचे ऑडिओ कॉल्स केले जातात.

काय दक्षता घ्यावी?
» कर्जासंबंधी ॲप नेहमी गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर मधूनच डाउनलोड करावे.
» अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नये.
» कर्ज देणारी संस्था RBIच्या अधिकृत यादीत आहे का, ते तपासावे.
» ॲपमध्ये पॅन, आधार, OTP यासारखी माहिती मागितल्यास ती कधीही शेअर करू नये.
» फसवणुकीचा बळी पडल्यास,
» cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा किंवा
» 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून माहिती द्या.