महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दिनांक 31 जुलै 2025 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने बार्शी शहरातील दोन अन्न पदार्थ विक्रेत्यांवर अचानक धाड टाकली.
ही धाड 1) मे. ए.एच. ट्रेडर्स, लता टॉकीज शेजारी, बार्शी (मालक: रिझवान रहिमान तांबोळी) आणि 2) मे. गजानन ट्रेडर्स, गणपती मंदिराजवळ, आडवा रस्ता, बार्शी (मालक: किरण शंकर कल्याणी) या दुकानांवर टाकण्यात आली.
या ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा जसे की बादशाह, के.आर. गुटखा, आरएमडी पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर सुगंधित सुपारी इत्यादी साठा आढळून आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु. 1,58,524/- एवढी आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी पुढील कारवाई करत रिझवान रहिमान तांबोळी, तांबोळी (पुरवठादार), शेख, मिलन, किरण शंकर कल्याणी, राम डोंबे आणि तांबोळी (पुरवठादार) या सात जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 605/2025 अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे.
ही संपूर्ण कारवाई साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी आणि उमेश भुसे यांनी संयुक्तपणे केली.
