बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. कल्याणी ब्रम्हानंद सहारे यांनी “इन्स्ट्रुमेंटल मेथडस ऑफ ॲनालिसिस” या विषयावर पुस्तक लिहिले असून, हे पुस्तक प्रितम प्रकाशन, जळगाव यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
बी. फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकात विषयाचे सुलभ, सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रा. सहारे यांना अध्यापनाचा अनुभव तर आहेच, शिवाय त्यांनी औषधनिर्मिती उद्योगातही प्रत्यक्ष काम केलेले असल्यामुळे या अनुभवाचा परिपाक पुस्तकात दिसून येतो.
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रा. सहारे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल. हे पुस्तक अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.”
