आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लक्ष्मी रोडवरून मोबाईल हिसकावणारे चोरटे गजाआड

Spread the love

पुणे : लक्ष्मी रोडवरील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

रियाज मुझम्मील खान (वय १९) आणि आयान जावेद शेख (वय १९, दोघे रा. अंगारशहा तकिया, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खान आणि शेख यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी खाद्यपदार्थ विक्रेता मूळचा परराज्यातील असून तो लक्ष्मी रोडवर कणीस विक्री करतो. ३० जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास तो काम संपवून घरी निघाला होता. त्या वेळी तो मोबाईलवर आईशी बोलत होता. लक्ष्मी रोडवर दुचाकीस्वार चोरटे खान, शेख आणि त्यांच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेला होता.

तपास पथकाने लक्ष्मी रोड परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. पोलीस अंमलदार आशिष खरात, अनिस शेख, राहुल मोरे व शिवदत्त गायकवाड यांच्या बातमीदाराने सांगितले की, आरोपी हे खडक येथे आहेत. या माहितीवरून पोलिसांनी खान, शेख आणि एका अल्पवयीन मुलाला पकडले.त्यांच्याकडून मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.


ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पांडुरंग वाघमारे, पोलीस अंमलदार गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर आणि सागर मोरे यांनी केली आहे.