राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण : भव्य रक्तदान शिबिरात ७९ बॉटल रक्त संकलन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे आनंद दरबार दत्तनगर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
थर्ड आय अॅक्टिवेशन एक्सपर्ट दर्श अभय सुराणा, कुस्ती सुवर्णपद विजेती सृष्टी रायरीकर आणि कबड्डी सुवर्णपद विजेता प्रणव पोळ यांचा खेळातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून ७९ बॉटल रक्तदान केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गौरव धोका, पवन चोरडिया व दीक्षा धोका यांनी परिश्रम घेतले.
दत्तनगर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुरेल सादरीकरण करून वातावरण दुमदुमवले. आनंद दरबार परिसर देशभक्तीपर रांगोळ्या, तिरंगे ध्वज पताका आणि गीतांनी सजून गेला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, ह.भ.प. दत्तात्रय कामठे, उद्योगपती विशाल कराळे, अनिल शेडगे, देविदास बेलदरे, ॲड. प्रेरणा आले, घोलप सर, कोचळे सर तसेच श्री चक्रधर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कोंढरे उपस्थित होते.
विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. यावेळी सभासद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या वेळी प्रकाश भटेवरा, विलास कोटेचा, दिलीप संचेती, संतोष भंडारी, संतोष दुगड, मंजूषा धोका, दीपाली चूत्तर, दीक्षा धोका, सुभास लुणावत, जवाहर धोका, प्रमोद राका व प्रमोद चोरडिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार सौरभ धोका यांनी मानले.
