महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : भुम येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचा उपविभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब काका क्षीरसागर, भाजपा भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर मंडळाध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, सिद्धार्थ जाधव, संदीप खामकर, बन्सी काळे, युवराज पवार, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष शुभम खामकर, फकीरा दल तालुका अध्यक्ष बाबासाहेब थोरात, नाना थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















