८५० सभासदांची उपस्थिती : मान्यवरांचे व्यवसायविषयक मार्गदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सराई सखी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेसाठी कंपनीच्या महिला सभासदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मान्यवरांनी उपस्थित सभासदांना विविध व्यवसाय, योजना व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करून प्रगतीचा मार्ग दाखवला.
सभेस कृषी विस्तार अधिकारी बिडवे, पोखरा योजनेचे गणेश शेंडगे, कृषी सहाय्यक खटाळ, परंडा येथील गणेश नेटके, पोलिस कॉन्स्टेबल ए. बी. पाटोळे व ॲड. अश्विनी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविकानंतर कंपनीच्या संचालिका दिलशाद तांबोळी यांनी कंपनीच्या मागील वर्षातील टर्नओव्हरची माहिती दिली तसेच पुढील वर्षी तो आणखी वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कंपनीचे तब्बल ८५० सभासद असून आगामी वर्षात सर्व सभासद सक्रिय सहभाग नोंदवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विस्तार अधिकारी बिडवे यांनी व्यवसाय वृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. गणेश शेंडगे यांनी पोखरा विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
कृषी सहाय्यक खटाळ यांनी तुती लागवड व त्यासाठी मिळणाऱ्या चार लाख तीस हजार रुपयांच्या अनुदानाची माहिती दिली. परंड्याचे गणेश नेटके यांनी सेंद्रिय शेतीच्या फायद्यांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका अर्चना सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कंपनीच्या सीईओ पुनम मोटे, संचालिका विजयमाला शेंडगे, संचालिका ज्योती वाघ, संचालिका मोहिनी गोडसे तसेच तालुका समन्वयक अपर्णा हुंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

















