महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी यांनी मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आय.टी. सिटी मेट्रो रेल लि., उड्डाणपूल कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट्स लि. व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या प्रतिनिधींसोबत औंध ते शिवाजीनगर मार्गावरील उड्डाणपुलाची स्थळपाहणी करून मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्या निर्देशानुसार कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
- उद्घाटनावेळी लावलेली तात्पुरती होर्डिंग्ज काढण्यात आलेली आहेत.
- औंध रस्ता व विद्यापीठ चौक येथील उड्डाणपूलाची उंची किमान ५.५० मी. राखून २१० मीटर रॅम्पचे काम तांत्रिक मान्यतेनंतर पूर्ण.
- दिशा दर्शक फलक बसविणे, समतलातील उंचवटा दुरुस्त करणे, खडी/कचरा साफ करणे यासंबंधी कंत्राटदारास सूचना.
- डांबरीकरण जून-जुलै महिन्यात पूर्ण केले असून, सद्यस्थितीत वाहतूक सुरु आहे व नैसर्गिक प्रक्रियेतून रस्ता अधिक मजबूत होईल.
- सध्या औंध–शिवाजीनगर मार्गावरील वाहतूक सुरु असून, बाणेर व पाषाण बाजूकडील बांधकाम प्रगतीपथावर आहे.
- पुणेकरांच्या सोयीसाठी उड्डाणपूल बांधकामाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न प्राधिकरणामार्फत सातत्याने सुरू आहेत.
