पुण्यात मंगळवारी ( ०९ सप्टेंबर २०२५) होणार भव्य उद्घाटन समारंभ
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मध्यस्थी क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व रॅडँक्स लिमिटेड (लंडन) यांच्या सहकार्याने सूर्यदत्त आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्र (एसआयएमसी) येथे मंगळवारी (ता. ९ सप्टेंबर) ‘आंतरराष्ट्रीय मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू होत आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२५ मध्ये सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व रॅडँक्स लिमिटेड (लंडन) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला होता. त्याअंतर्गत आता ८० तासांचा ‘आंतरराष्ट्रीय मेडिएशन फाउंडेशन ट्रेनिंग कोर्स’ राबवला जाणार आहे.
भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मध्यस्थ व शांततेचे नेते बनविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. या उद्घाटन प्रसंगी रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापक व आंतरराष्ट्रीय मध्यस्थी तज्ज्ञ डॉ. रेणू राज, सर्वोच्च न्यायालय मध्यस्थ संघटनेचे अध्यक्ष आर. संथानकृष्णन, राज्यसभा सचिवालयातील माजी संयुक्त सचिव प्रदीप चतुर्वेदी आणि प्रमाणित मध्यस्थ आर. पी. मिश्रा यांची विशेष उपस्थिती असेल.
याशिवाय सूर्यदत्त फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, विविध संस्थांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. डॉ. रेणू राज या जगभरात कायदेशीर मध्यस्थी प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असून भारताच्या मध्यस्थी विधेयक सुधारणा समितीच्या सदस्य राहिल्या आहेत.
२०२४ मध्ये त्यांना लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार मिळाला असून ५० सर्वात प्रभावशाली भारतीय महिलांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्या म्हणाल्या, “हा उपक्रम उत्कृष्टता, नावीन्य आणि सीमापार सहकार्याला चालना देणारा आहे.
भारतासाठी हे एक अग्रगण्य पाऊल तर जगासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.” नुकतेच राज्यसभा सचिवालयातून निवृत्त झालेले प्रदीप चतुर्वेदी हे आंतरराष्ट्रीय कायदा व प्रशासकीय कायद्यातील तज्ज्ञ आहेत.
त्यांनी अफगाणिस्तानच्या न्याय मंत्रालयासोबत सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आर. संथानकृष्णन यांनी मध्यस्थीच्या पद्धतीत क्रांती घडवून आणत संघर्ष निराकरणाच्या क्षेत्राला आकार दिला आहे.
आर. पी. मिश्रा हे आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असून बांधकाम व पुरवठा साखळी विवाद निराकरणातील तज्ज्ञ आहेत. सूर्यदत्त संस्थेतर्फे यापूर्वीही अनेक मान्यवर न्यायाधीश व वकिलांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा, न्यायमूर्ती एन. व्ही. एस. शिरपूरकर, अॅड. उज्ज्वल निकम, माजी ऍटर्नी जनरल मोहन परासर यांच्यासह अनेकांचे नाव अग्रणी आहे.
सूर्यदत्त लॉ कॉलेज – एक स्वप्न सत्यात : १९८३ मध्ये नूतन मराठी विद्यालयाच्या शताब्दी कार्यक्रमात तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा सत्कार झाला. तेव्हाच त्यांनी कायद्याचे शिक्षण देणारी संस्था स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. चार दशकांनंतर २०२३ मध्ये सूर्यदत्त लॉ कॉलेज स्थापन होऊन हे स्वप्न पूर्ण झाले. आंतरराष्ट्रीय मध्यस्थी प्रशिक्षण हा त्याचाच एक विस्तार आहे.
नोंदणी आवश्यक : सूर्यदत्त येथील मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कायदा क्षेत्रातील सर्वांसाठी खुला आहे. उपस्थितीसाठी पूर्व-नोंदणी आवश्यक असून आयोजक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि श्रीमती सुषमा चोरडिया यांनी सर्वांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
