महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शहरात हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली.
शहरातील विविध भागांत मिरवणुकीत सहभागी झालेल्या बालकांना खाऊ, शरबत, फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पैगंबरांनी दिलेला शांती, समानता आणि मानवतेचा संदेश मिरवणुकीतून जागवण्यात आला.
“आई-वडिलांशी चांगले वागा, पिडीत व्यक्तीस मदत करताना तो कोणत्याही धर्माचा आहे की नाही याचा विचार करू नका, शेजाऱ्यांचे हक्क द्या आणि कुणालाही उपाशी झोपू देऊ नका” असा संदेश मिरवणुकीदरम्यान अधोरेखित करण्यात आला. जयंतीनिमित्त मिरवणुकीस भूम शहरातील मेहंतीशावली दर्गाह येथून प्रारंभ झाला.
या आयोजनात आख्तर जमादार, वस्ताद मामु जमादार, माजी नगराध्यक्ष शाकीर शेख, माजी उपनगराध्यक्ष तौफिक कुरेशी, बबलु बागवान, आसिफ जमादार, नदीम कुरेशी, आज्जु जमादार, राजु कुरेशी, मोईन शेख, फिरोज फकीर, रफीक फकीर, यजाज काझी, आमर जमादार, पैलवान चांद सय्यद, बाबा मोमीन, समीर शेख, मुश्ताक कुरेशी, जुबेर चाऊस, आदिल चाऊस आदींनी परिश्रम घेतले.
मिरवणुकीदरम्यान मुजावर गल्ली, गराडा गल्ली, संजय गाढवे मित्र मंडळ, वसीम काजळेकर यांच्या वतीने बालकांना शरबत, फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच भूम शहर जुलुस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
