JBN युथ विंग पुणे : १२० उद्योजकांची उपस्थिती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जीतो बिझनेस नेटवर्क युथ पुणेच्या वतीने उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत गुरुवारी जेबीएन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड उपस्थित होते.
लुल्लानगर येथील हॉटेल अतिथी येथे झालेल्या या जेबीएन बैठकीची मीट, ग्रीट अॅण्ड नेटवर्क ही थीम होती. या जेबीएन बैठकीसाठी १८ ते ३६ वर्षे वयोगटातील उद्योजक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीमध्ये बिझनेस वाढीसाठी नेटवर्कींग, रेफरल्स मिळाले. त्यातून ६.७ कोटी रुपयांचा बिझनेस झाला. आतापर्यतच्या जेबीएन बैठकांमध्ये सगळा मिळून २३० कोटी रुपयांचा बिझनेस झाला आहे.
जेबीएन युथ पुणेच्या वतीने आयोजित केलेल्या या जेबीएन बैठकीसाठी जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव बाठिया, मुख्य सचिव सुयोग बोरा, जेबीएनचे समन्वयक भूषण चोपडा व सहसमन्वयक यश रुनवाल यांनी विशेष काम केले.
लर्न, अर्न, रिटर्न – उद्योग व व्यापारामध्ये तरुणांनी बेधडक काम करायला पाहिजे. कामातूनच आत्मविश्वास येतो. युवा पिढीने सुरुवातीला शिका, त्यानंतर कमवा आणि मग समाजाला परत करा. यश मिळवायचं असेल तर, जबरदस्त नेटवर्क निर्माण करायला पाहिजे. तुमचं जेवढं नेटवर्क असेल तेवढं तुमचं नेटवर्थ वाढेल. यशस्वी उद्योगाची ही गुरुकिल्ली आहे. आणि जीतो मध्ये त्यामुळेच जेबीएन सारखे उपक्रम राबवले जातात. जेबीएन च्या माध्यमातून नेटवर्क निर्माण होते. रेफरल्स मिळतात. आणि उद्योग व व्यापाराच्या वृद्धीसाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जीतो संघटनेचे यश या नेटवर्कमुळेच आहे. – विजय भंडारी, राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अॅपेक्स
नेटवर्कींगसाठी JBN – “नेटवर्किंगसाठी JBN ही अतिशय परिणामकारक व्यासपीठ आहे. जीतोचे सदस्य असाल तर जेबीएनच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेले मजबूत नेटवर्क उभे करता येते. इथे मिळणारे रेफरल्स थेट बिझनेस वाढवतात. आजच्या बैठकीत तरुण उद्योजकांची उत्साही उपस्थिती दिसली. अशा उपक्रमांमुळे नवीन संधी निर्माण होतात, एकमेकांचे अनुभव शेअर होतात आणि व्यवसायाला गती मिळते. जीतो पुणे युथ विंगने केलेले हे आयोजन नक्कीच सर्वांसाठी लाभदायक ठरेल.”. – इंद्रकुमार छाजेड़, अध्यक्ष, जीतो पुणे
