महाराष्ट्र न्यूज नेटवर्क च्या पडताळणीतून उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) धाड पडल्याचे वृत्त काही स्थानिक माध्यमांनी दिले होते. परंतु महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या खात्रीशीर सूत्रांनी केलेल्या पडताळणीत हे वृत्त पूर्णपणे खोटे ठरले आहे.
माध्यमांतून अचानक पसरलेल्या या बातमीमुळे बांधकाम क्षेत्रात तसेच गुंतवणूकदार व घर खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क च्या चौकशीतून ईडीने अशी कोणतीही धाड टाकलेली नसल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, शहरातील काही इतर बांधकाम व्यावसायिकांविरोधात प्राप्तिकर विभागाकडून नियमित चौकशी सुरू असल्याचे समजते. काही ठिकाणी चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
व्यावसायिक स्पर्धेमुळे प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येत आहे.
