विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक : जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शीचे प्रतिनिधित्व
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : फिनिक्स पोदार लर्न स्कूल, बार्शीच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेच्या संघात कर्णधार आचल खुणे, अक्षरा देशमाने, रिचा गुगळे, ज्ञानेश्वरी वाघमारे, संस्कृती सरवदे, जानवी अंधारे, दिया गुंजाळ, शर्वरी पवार, ऋचा मेटकरी, रती तळेकर व श्रेया जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या संघभावना, कौशल्यपूर्ण खेळ आणि चिकाटीच्या जोरावर अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अजिंक्यपद मिळवले. या विजयाबद्दल शाळेच्या अध्यक्षा वैशाली कबाडे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
शाळेचे सचिव संदीप बरडे यांनी अभिनंदन केले, तर मुख्याध्यापक रविराज बेलुरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक व पालकांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या यशामुळे पोदार स्कूलचा संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून पुढील सामन्यांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
