उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार, सहसचिवपदी आशिष दुगड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची राज्यातील सर्वात अग्रगण्य आणि नावाजलेल्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या अध्यक्षपदी तीसऱ्यांदा राजेंद्र बाठिया यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अजित बोरा तर सचिवपदी ईश्वर नहार व सहसचिवपदी आशिष दुगड यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या द्वैवार्षिक निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची व चेंबरच्या कार्यकारी मंडळाची सभा झाली. या सभेमध्ये नुतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहिर केली.
सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेऊन आम्हांस व्यापाऱ्यांच्या हितासाठी निवडून दिले आहे.
संपूर्ण कार्यकारी मंडळ चेंबरची प्रतिष्ठा यापुढेही उंचावण्याचे व व्यापारी हितासाठी जोमाने कार्यरत राहील, मार्केट यार्ड येथील व्यापारवाढीसाठी, कायद्यामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाबरोबर संवाद साधून पारंपारिक व्यापार टिकविण्याचे प्रयत्न करेल.
सर्वप्रथम महाराष्ट्रातील पुरग्रस्त नागरिकांसाठी दि पूना मर्चेंटस् चेंबर रिलीफ फंडाच्या माध्यमातून नियोजनबध्द मदत करण्याचा चेंबरचा प्रयत्न राहील, मार्केट यार्ड मधील स्वच्छता व सुविधा वाढविण्यासाठी बाजार समिती बरोबर चर्चा करुन नियोजन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी दिली.
तसेच कार्यकारी मंडळावर स्विकृत सदस्य म्हणून महिपालसिंह राजपुरोहित, प्रकाश नहार, संदिप शहा, सुहास दोशी यांची नियुक्ती केली आहे. तसेच आमंत्रित सदस्य म्हणून हरिराम चौधरी, मुकेश छाजेड, मुकेश शहा, आशिष नहार यांची नियुक्ती केली आहे.
तसेच चेंबरच्या वाणिज्य विश्व समिती, बांधा निवाडा समिती, समन्वय समिती स्त्री कामगार कल्याण योजना समिती व क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती आदी समित्यांचेही गठन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच “कृषी पणन व शासकीय कार्य समिती“ चे गठन करण्यात आले आहे.
त्याचे समन्वयक म्हणून नविन गोयल यांची निवड करण्यात आली सदर समितीमध्ये प्रविण चोरबेले, दिनेश मेहता व सर्व पदाधिकारी यांचा समावेश आहे.
