बिबवेवाडीतील यश लॉन्समध्ये भव्य दांडिया रात्र : मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर स्काय एंटरटेनमेंटतर्फे यंदा ‘बॉलीवूड दांडिया २०२५’ हा भव्य सोहळा बुधवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे रंगणार आहे. या उत्सवात सुप्रसिद्ध गायिका स्वस्ती मेहुल आपल्या सादरीकरणाने दांडियाची रंगत वाढवणार आहे.
स्वस्ती मेहुल हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीस पात्र ठरलेले प्रसिद्ध “राम आयेंगे” हे गाणे गायले असून, त्यानंतर ती देशभरात चर्चेत आली होती. अशी ही लोकप्रिय गायिका स्वतः या दांडिया कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या आवाजाचा जादू दाखवणार आहे, त्यामुळे नवरात्रीतील हा सर्वात मोठा दांडिया महोत्सव ठरणार आहे.
या दांडिया महोत्सवाचे आयोजन आदेश चोरबेले, आकाश शहा आणि शुभम लुणावत यांनी केले आहे. या सोहळ्यासाठी विविध नामांकित उद्योजकांनी सहकार्य दिले आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून न्याती ग्रुप (Nyati) असून, को-टायटल स्पॉन्सर म्हणून रविराज रियाल्टी सहभागी झाले आहेत.
पॉवर्ड बाय राणावत ग्रुप तर को-पॉवर्ड बाय मोहीनी बाय दिलीप सोनिगरा आहे. सिद्धिविनायक ग्रुप्सने हा कार्यक्रम प्रेझेंट केला असून, लीड असोसिएट म्हणून साहीलचे योगदान आहे. एज्युकेशन पार्टनर म्हणून सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे कार्यरत आहे.
कार्यक्रमाला हायड्रेशन पार्टनर म्हणून झीरो, हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हयात रीजेंसी, गिफ्टिंग पार्टनर म्हणून आर्ट अँड बियॉन्ड व जुली बॅग्स, फोटोग्राफी पार्टनर म्हणून राजपाल प्रॉडक्शन्स, वॉर्डरोब पार्टनर कपल म्हणून कृषिका आणि वॉर्डरोब पार्टनर मेन्स म्हणून श्रीराम एथनिक यांचे सहकार्य लाभले आहे.
मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ही या उत्सवाशी जोडले गेले आहे. याशिवाय कोहिनूर ग्रुप, मास्टर मार्केटिंग, एम्पायर ग्रुप (गौरव गणेश घुले), कामधेनू, अभिषेक निंबाळकर, जयवंत ग्रुप, क्यू टेस्ट, सुहाना स्पायसेस, ला युनिकॉ, झुरिच ऑटोमोटिव्ह, लिओनार्ड ट्रॅव्हल्स, कुशल लँडमार्क, कल्याण भेल, झोमॅटो, एएम टू एएम, क्रॅझांटो, डोअर टू साऊथ, नॉर्थ ३७ ढाबा, गिरिकंद हॉलिडेज, आफ्टर्स पेस्ट्रीज, तंत्रा रिअॅलिटी आणि विलायती यांसह अनेक संस्था या दांडिया सोहळ्याचे समर्थक म्हणून सहभागी होत आहेत.
रंगीबेरंगी वेशभूषा, बॉलिवूड संगीतावर थिरकणारे पाय आणि देवीभक्तीने भारलेले वातावरण यामुळे नवरात्रीचा आनंद द्विगुणित होणार आहे. स्काय एंटरटेनमेंटने सलग तेराव्या वर्षी हा उत्सव आयोजित केला असून, पुणेकर तरुणाईसाठी हा दांडिया जल्लोष अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
तिकीट बुकिंगसाठी ८८८८६२९४९४ आणि ८३९०९०८८८८ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल, तसेच bookmyshow.com वर ऑनलाइन बुकिंगचीही सुविधा उपलब्ध आहे.
