समाजहितासाठी नवे पर्व : सेवाभावी कार्याची दखल : जैन समाजात आनंदोत्सव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्यातील जैन समाजातील प्रतिष्ठित उद्योजक व सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सिद्धी ग्रुपचे सदस्य मुकेश छाजेड यांची दि. पुना मर्चंट चेंबरच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे जैन समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुकेश छाजेड यांनी समाजहितासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. सिद्धी ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली, आपत्कालीन प्रसंगी गरजूंपर्यंत मदत पोहोचवली आणि पुण्यात धार्मिक सेवांची परंपरा जोपासली.
कोरोना काळात त्यांनी ‘जीतो’च्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे कार्य करत लोकांसाठी रुग्णालये उपलब्ध करून दिली तसेच अन्नधान्याचे किट्स वाटप करून शेकडो कुटुंबांना आधार दिला. त्यांच्या या नि:स्वार्थी कार्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
सध्या ते जीतो पुणेचे डायरेक्टर म्हणून कार्यरत असून सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश सातत्याने पोहोचवत आहेत. जैन समाजातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून,
“मुकेशजींची दि. पुना मर्चंट चेंबरमधील निवड ही संपूर्ण जैन समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या कार्यामुळे समाजाच्या सेवाभावी उपक्रमांना नवी दिशा मिळेल,” असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर समाजासाठी आणखी काही करण्याची मोठी संधी आहे. समाजाच्या विश्वासाला उतरून अधिकाधिक सेवाभावी उपक्रम राबवण्याचा माझा संकल्प आहे. – मुकेश छाजेड
