महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
कोर्टी येथे झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावत संघाने जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळवला. या संघाची पुणे विभागीय स्तरावर निवड झाली आहे या विजयी संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश आहे: पुरुराज पाटील, आर्यन जाधवर, रणवीर मोरे, सर्वेश झोंबाडे, ऋषिकेश काळे, श्रेयस भोसले, ऋषिकेश घोडके, संस्कार उपळकर, शिवरत्न वहावणे, ओंकार गुरव, समर्थ सातपुते आणि विनय वाघ.
संघाला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील, योगेश उपळकर, विकास पाटील, शिवराज बारंगुळे, आदित्य माने, क्षितिज लांडगे आणि यश काळे यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच प्रा. सुरेश लांडगे व प्रा. दीपक गुंड यांचे विशेष मार्गदर्शनही खेळाडूंना मिळाले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष श्री. एन. एन. जगदाळे साहेब, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री. पी. टी. पाटील साहेब, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री. ए. पी. देबडवार साहेब, खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. जयकुमार शितोळे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मिराताई यादव, श्री. एस. बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य यांनी केले.
तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री. एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका सौ. एन. बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
