“सुसाईड प्रिव्हेन्शन” विषयावर डॉ. कैवल्य गायकवाड यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंटरनॅशनल च्या ऑक्टोबर सर्व्हिस वीक अंतर्गत मेंटल हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात महत्त्वाच्या विषयावर “Suicide Prevention” वर डॉ. कैवल्य गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. कैवल्य गायकवाड यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मन मोकळे करण्याची गरज, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मप्रेरणा याबाबत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक सजगता वाढीस लागली.
या वेळी फर्स्ट इयर्सचे 180 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डॉ. कैवल्य गायकवाड यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या उत्तरे समजून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास ही संवादात्मक पद्धत अत्यंत उपयुक्त ठरली.
कार्यक्रमाला एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, प्रभारी प्राचार्य प्रा. मृगेन्द्र अंधारे, विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण मदने, तसेच लिओ क्लब बार्शी टाऊन संचालक लिओ पवन श्रीश्रीमाळ, लिओ आदित्य सोनिग्रा व लिओ यश मेहता उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प प्रमुख लिओ सायली श्रीश्रीमाळ, लिओ राधिका रायचुरकर, लिओ पलक कुंकुलोळ, एमआयटी कॉलेजचे प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर प्रा. प्रदीप जगदाळे, लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ CA तेजस रायचुरकर, कोषाध्यक्ष लिओ रोनक कुंकुलोळ, क्लब टेमर लिओ गौरव सुराणा, लिओ डॉ. युक्ता सोनिग्रा आणि लिओ रिद्धी बाफना यांनी विशेष योगदान दिले.
सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुप्रिया जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिओ क्लबचे अध्यक्ष CA तेजस रायचुरकर यांनी केले. लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
