श्री नवकार जैन सेवातीर्थ गोशाळेतील लहान वासरांना घी, गुळ आणि दूध देऊन पोषणाची मदत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दिनांक ०२/१०/२०२५ गुरुवार रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे श्री नवकार जैन सेवातीर्थ संचालीत शहः धारशी जिवन देसाई गोशाळेतील लहान गाईच्या वासरांना घी, गुळ आणि दूध पाजून वाचनालयाकडून रू. २१,०००/- देणगी देण्यात आली.
ही देणगी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ व संचालक धिरज कुंकूलोळ, आशोक कांकरिया, प्रमोद भंडारी यांच्या हस्ते गोशाळेचे अध्यक्ष प्रदिप बागमार, धन्यकुमार शहा, पदमभाई कांकरीया, पवन श्रीश्रीमाळ, निरव छेडा यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.
अलीकडे पोलिसांनी गोतस्करी करणारी एक गाडी पकडली होती, ज्यात तब्बल ३५ जर्सी गाईंची खोंडै व कालवडी आढळली. या गाडीतून ५ खोंडै मृत अवस्थेत आल्या, तर उर्वरित सर्व खोंडै सुरक्षितपणे गोशाळेत आणण्यात आल्या. सध्या या लहान वासरांना बाटलीने दूध पाजले जात आहे, आणि या निरागस जीवांच्या संगोपनासाठी वाचनालयाकडून मदत करण्यात आली.
या कार्यक्रमास श्री जैनाश्रमचे ट्रस्टी भारतभाऊ कोटेचा, अध्यक्ष जयचंद सुराणा, ऑ.सेक्रेटरी ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, माझी अध्यक्ष अजित कुंकूलोळ, संचालक गौतम बोथरा, प्रविण पुनमिया, महावीर दुगड, अशोक सुराणा, सुजित गुंदेचा, अतुल सोनिग्रा, प्रशांत कथले, श्री जैनाश्रमचे महिला मंडळ, वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ. शितल लुकडे व क्लार्क विराज पतंगे उपस्थित होते. समाजातील सर्व वर्गातून या वाचनालयाच्या कार्याचे कौतुक होत आहे.
