“नांदेडकरांसाठी आरोग्य सेवेची नवी संजीवनी”
महाराष्ट्र जैन वार्ता
नांदेड : परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्य निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
या शाखेचे उद्घाटन राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच सतीश बनवट यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासण्यांचा वाढता खर्च सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठे आव्हान ठरतो. आवश्यक चाचण्या करून घेण्यात अनेकदा रुग्ण टाळाटाळ करतात आणि त्यामुळे पुढे गंभीर शारीरिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर डायग्नोपिनने “कमी किमतीत, पण उच्च गुणवत्तेचे रिपोर्ट्स प्रत्येकापर्यंत पोहोचवणे” हे ध्येय ठेवून आपली सेवा नांदेडमध्ये सुरू केली आहे. नव्या शाखेत एमआरआय फक्त 2500 मध्ये, सीटी स्कॅन 999 पासून, सोनोग्राफी 500 पासून, तसेच एक्स-रे, 2D इको, ईसीजी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आणि दंतचिकित्सेचे उपचार या सेवा उपलब्ध आहेत.
या सुविधा नांदेड रेल्वे स्टेशनसमोर डॉक्टर्स लेन येथे रुग्णांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
या शुभारंभ प्रसंगी अॅड. अनिकेत भक्कड, डॉ. रमेश नारलावार, डॉ. मनोज भंडारी, डॉ. मुकेश बंगाळ, माधव घोगरे, महेंद्र जैन, मनोज श्रीश्रीमाल, दिपक कोठारी, आदर्श बाफना, परेश मुनोत, सुनील जोशी, अमित गांधी, अॅडीशनल एस. पी. अशोक कदम, रमेश तावडे, शामजी लाहोटी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल कोठारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मितेश कोठारी यांनी मानले.
