महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : भुम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत भारतीय जैन संघटनेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. पूरस्थितीत अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.
या वाटप कार्यक्रमावेळी अॅड. कांचनमाला संघवी, जयकुमार जैन, अतुल अजमेरा, सुनीलकुमार डुंगरवाल, जयघोष जैन, सागर दुरुंडकर, अक्षय गांधी, कांतीलाल बोराणा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनी पूरग्रस्तांना धीर देत आवश्यक ते सहाय्य पोहोचविण्याचे आश्वासन दिले. भारतीय जैन संघटनेच्या या उपक्रमाचे स्थानिक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले असून अशा समाजोपयोगी कार्यातून मानवतेचा संदेश दिला जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.















