महाराष्ट्र न्युज नेटवर्क
वाशी : वाशी तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेतर्फे तहसीलदार व कृषी अधिकारी वाशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकी विक्रीसाठी साथी पोर्टल/ॲप व कीटकनाशके विक्रीसाठी प्रस्तावित ॲपला विरोध तसेच कृषी केंद्रांकरिता लागू असलेल्या अनावश्यक नियम व कारवाईविरुद्ध एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्याची घोषणा करण्यात आली. राज्य संघटनेच्या ‘माफक’ च्या आवाहनानुसार दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी वाशी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.

















