महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘जैन वधू-वर परिचय संस्था, पुणे’ यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाची बैठक संस्थेचे मावळते अध्यक्ष दिलीप मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीचे वातावरण उत्साहपूर्ण होते आणि सर्व सदस्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीत मुकेश शहा यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच रोहित झवेरी उपाध्यक्ष, भावेश शहा सेक्रेटरी, आणि योगेश शहा खजिनदार म्हणून नियुक्त झाले.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अमोल झवेरी, आशिष मेहता, प्रियेश शहा, केतन शहा, राकेश गांधी, मिनल शहा, निलेश शहा आणि भारती शहा यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे मावळते अध्यक्ष दिलीप मेहता यांनी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांनी नव्या टीमला मार्गदर्शन करताना सांगितले की, “संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि समाजहिताच्या दृष्टीने राबवावे, हेच आमचे उद्दिष्ट असावे.” तसेच त्यांनी नव्या कार्यकारिणीकडून संस्थेच्या उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘जैन वधू-वर परिचय संस्था, पुणे’ ही संस्था अनेक वर्षांपासून समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना एकत्र आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेतर्फे नियमितपणे जैन वधू-वर परिचय मेळावे, माहिती पुस्तिका प्रकाशन, उपवर वधू-वर माहिती केंद्र, तसेच ‘शुभमंगल योजना’ यांसारखे उपक्रम राबवले जातात.
या उपक्रमांमुळे समाजातील अनेक कुटुंबांना योग्य जुळवणीसाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

 
			

















