स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागली होती, तो कार्यक्रम अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींमध्ये २ डिसेंबर रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यात सर्वाधिक ६० नगरपरिषद पुणे जिल्ह्यात आहेत. नाशिक विभागात ५९, नागपूरमध्ये ५५, तर कोकण विभागात २७ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
१३,३५५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. २८८ अध्यक्ष, ३,८२९ प्रभाग, आणि ५,८५९ सदस्य पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम –
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर – २६ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
निकाल जाहीर करण्याची तारीख – १० डिसेंबर २०२५
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवली –
| संस्थेचा प्रकार | अध्यक्षपदासाठी मर्यादा | सदस्यपदासाठी मर्यादा |
|---|---|---|
| अ वर्ग नगरपरिषद | ₹15 लाख | ₹5 लाख |
| ब वर्ग नगरपरिषद | ₹11.25 लाख | ₹3.50 लाख |
| क वर्ग नगरपरिषद | ₹7.50 लाख | ₹2.50 लाख |
| नगरपंचायत | ₹6 लाख | ₹2.25 लाख |
मतदारसंख्या व मतदान केंद्रे –
या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार पात्र आहेत.
त्यासाठी राज्यभरात १३,३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरली जाणार आहेत.
त्यासाठी एकूण १३,७२६ कंट्रोल युनिट्स आणि २७,४५२ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.















